Train To Kashmir : मंगळवारी (20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे उदघाटन केले. याबरोबरच पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पहिली इलेक्ट्रिक ट्रेन रवाना झाली. यावेळी तिथे बर्फवृष्टी होत होती आणि बर्फवृष्टीत धावणारी रेल्वे असे विलोभनीय दृश्य उपस्थितांना पाहायला मिळाले. देशाच्या कोणत्याही भागातून रेल्वेने काश्मीरला ( Train To Kashmir ) जाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
या मार्गावरून धावली ट्रेन
पीएम मोदींनी श्रीनगर ते सांगलदान आणि सांगलदान ते श्रीनगर या इलेक्ट्रिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही काश्मीरची ( Train To Kashmir ) पहिली इलेक्ट्रिक ट्रेन आहे.ही ट्रेन सुरू झाल्यामुळे तेथील सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सांगलदान आणि बारामुल्ला स्थानकांदरम्यान DEMU ट्रेनलाही पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन स्थानिक शेतकरी, व्यापारी, कारागीर आणि विद्यार्थ्यांना वाहतुकीचे उत्तम पर्याय उपलब्ध करून देईल.यासोबतच या परिसरात पर्यटनालाही चालना मिळणार असून त्यामुळे रोजगार वाढणार आहे.
देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा (Train To Kashmir )
पंतप्रधान मोदींनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वरील भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे उद्घाटनही केले. एका आधिकऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार “हा , 12.77 किमी लांबीचा सर्वात लांब बोगदा आहे आणि T-50 म्हणून ओळखला जातो, तो खड-सुंबडच्या दरम्यान येतो,” उत्तर रेल्वे (NR) नुसार, गाड्या आता बारामुल्ला ते बनिहाल मार्गे सांगलदान पर्यंत धावू शकतात, जे पूर्वी शेवटचे किंवा मूळ स्थानक होते. बनिहाल-खारी-संबर-सांगदल विभागातील 11 बोगद्यांपैकी T-50 हा सर्वात आव्हानात्मक मानला जातो.
यापूर्वी बारामुल्ला ते बनिहाल दरम्यान आठ डिझेल गाड्या (प्रत्येक मार्गाने चार) धावत होत्या. आता, आठ विद्युतीकृत ( Train To Kashmir ) गाड्या बारामुल्ला आणि बनिहाल दरम्यान धावू लागल्या आहेत आणि त्यापैकी चार सांगलदानपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. आणखी चार गाड्याही काही महिन्यांनंतर सांगलदनपर्यंत वाढवण्यात येणार आहेत.