औरंगाबाद | कोरोना महामारी च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनशताब्दी एक्सप्रेस ची वेळ बदलण्यात आली आहे. मुंबई जाण्यासाठी पूर्वी 6 वाजता रेल्वे निघत होती. परंतु आता ही सहा वाजताची रेल्वे साडेनऊ वाजता सुटत आहे. परंतु या वेळेमुळे मुंबईला पोहोचण्यासाठी संध्याकाळी होत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे सायंकाळी काहीच काम नसते. यावेळी मुंबईतील शासकीय आणि खाजगी कार्यालय बंद होऊन जातात. यामुळे व्यापारी आणि व्यावसायिक यांची प्रचंड गैरसोय होत असल्याने प्रवाशांनी रेल्वेची पूर्वीप्रमाणे वेळ करण्याची मागणी केली आहे. औरंगाबादकरांसाठी जनशताब्दी एक्सप्रेस ही रेल्वे खास असून 14 फेब्रुवारी पासून ही रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे सुरू झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले परंतु या रेल्वेची वेळ बदलल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
जनशताब्दी एक्सप्रेस जेव्हा सहा वाजता औरंगाबाद येथून सुटत होती तेव्हा बारा ते एक वाजेपर्यंत मुंबईला सर्व प्रवासी पोहोचत होते. यामुळे शासकीय सर्व कामे आटपून नंदिग्राम देवगिरी या एक्सप्रेस मधून परतीचा प्रवास करणे सोपे होत होते. परंतु आता सर्वच शेड्युल कोलमडल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.