TRAI चा नवीन आदेश, आता मोबाईल नंबर पोर्ट केल्यावर ग्राहकांना कोणताही लाभ मिळणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) गुरुवारी सर्व टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्ससाठी कठोर निर्देश जारी केले आहेत. ज्यात असे म्हटले गेले आहे की,”टेलिकॉम कंपन्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचे चॅनेल, डिस्ट्रीब्यूटर्स आणि रिटेलर्स ग्राहकांना स्पेशल टॅरिफ ऑफर करू नयेत, ज्याला भाळून ग्राहक इतर नेटवर्कवर मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) करत आहे.”

TRAI ने टेलिकॉम ऑपरेटर्सना याची आठवण करून दिली की,” मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी स्पेशल ऑफर देणे हे टेलिकॉम टॅरिफ ऑफर आणि इतर नियमांचे “उल्लंघन” आहे जे TRAI ने या संदर्भात वेळोवेळी जारी केलेले आहेत. शुल्कामधील भेदभाव दूर करणे हा या नियमांचा हेतू आहे.”

TRAI ने काय सांगितले ते जाणून घ्या?
तसेच, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अशा प्रकरणांमध्ये नियामक तरतुदी आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेटर्सची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. TRAI ने आपल्या आदेशात सर्व टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सना (TSPs) तात्काळ प्रभावीपणे याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत की, नियामकला माहित असलेले दर केवळ त्यांच्या चॅनेल पार्टनर्स, डिस्ट्रीब्यूटर्स, रिटेलर्स किंवा थर्ड पार्टी एप्सद्वारे दिले जातील.

TRAI चे नवीन आदेश जाणून घ्या
TRAI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि तरतुदींचे पालन सुनिश्चित करण्याची जबाबदारी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सची असेल, जेथे ऑपरेटर्सचे नाव किंवा ब्रँड प्रॉडक्ट्सचे मार्केटिंग किंवा विक्रीसाठी वापरले जाते, असेही नियामकाने म्हटले आहे. TRAI ने टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडून एकमेकांविरोधात तक्रारी मिळाल्या होत्या, ज्यामध्ये प्रतिस्पर्धी कंपन्या मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) आधारित टॅरिफ देत असल्याचा आरोप केला होता. यानंतरच TRAI कडून हा आदेश आला.

Leave a Comment