1 एप्रिलपासून NPCI चा नवा नियम लागू; ‘या’ नंबर्सवर होणार नाहीत व्यवहार !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही स्मार्टफोनद्वारे बँकिंग किंवा UPI अँपद्वारे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या नवीन नियमांनुसार, वापरात नसलेले मोबाईल नंबर बँक खात्यांमधून अन UPI अँप्समधून काढून टाकले जाणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना बंद पडलेल्या फोन नंबरवरून पेमेंट करता येणार नाहीत. म्हणजेच याचा थेट परिणाम UPI वापरकर्त्यांवर होणार आहे.

UPI पेमेंट्स किंवा बँकिंग व्यवहार करता येणार नाही –

जर तुमचं बँक खाते किंवा UPI अँप्स (जसे की Google Pay, PhonePe, Paytm) कोणत्या तरी मोबाईल नंबरशी लिंक केले असेल, आणि त्या नंबरवर काही महिने रिचार्ज किंवा सक्रियता नसेल, तर तो नंबर तुमच्या बँक खात्यातून काढून टाकला जाणार आहे. या बदलामुळे, त्या निष्क्रिय नंबरवरून UPI पेमेंट्स किंवा बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत.

NPCI ने या निर्णयाचे कारण –

NPCI ने या निर्णयाचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, निष्क्रिय मोबाईल नंबरमुळे सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अन UPI व बँकिंग प्रणालीतील तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तसेच, टेलिकॉम कंपन्या निष्क्रिय नंबर दुसऱ्या व्यक्तींना देतात, ज्यामुळे फसवणुकीचा धोका वाढतो.या बदलामुळे, 1 एप्रिल 2025 नंतर, जर तुमचे बँक खाते एखाद्या निष्क्रिय नंबरवर लिंक केले असेल, तर तुम्हाला ते अपडेट करण्याची आवश्यकता असेल. वापरकर्त्यांना या बदलाची तातडीने माहिती असावी आणि योग्य ती पावले उचलावीत, त्यामुळे 1 एप्रिलनंतर त्यांना UPI सेवा वापरण्यात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.