नागपूर । तुकाराम मुंढे यांच्या बदल्यांच्या मालिकेत नावं आश्चर्यकारक वळण आलं आहे. नागपूर पालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच त्यांचा बदली आदेश रद्द करण्यात आला आहे. बदलीचा आदेश रद्द करण्यात आला असून यामागे नेमकं काय घडलं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
नागपूर महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. २६ ऑगस्ट रोजी या बदलीचे आदेश निघाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी ही बदली करण्यात आली होती. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच अचानक आज मुंढे यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आल्याने सारेच अवाक् झाले आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करताना आता मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मुंबई) सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असल्याचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, नागपूर पालिका आयुक्तपदावरून मुंढे यांची बदली झाल्यानंतर या पदाचा कार्यभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तुकाराम मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्त म्हणून कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.