एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली ”ही” महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात अद्यापही काही एसटी कर्मच्रायांकडून आंदोलने केली जात आहेत. तर काहीजण कामावर हजर झालेले आहेत. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता शेवटचा इशारा दिला आहे. निलंबित केलेल्या 10 हजार कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस देणार आहे. सेवेतून बडतर्फ का करू नये? यासाठी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे मंत्री परब यांनी म्हंटले आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही कामावर न परतलेल्या सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना करणे दाखवा हि नोटीस पाठवणार आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून या नोटीशीनंतर संपावरील कर्मचाऱ्यांना 8 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. 20 तारखेला कोर्टाची तारीख आहे, त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल, तोपर्यंत कामावर यावे, असे आवाहन यावेळी परब यांनी केले आहे.

दरम्यान, आतापर्यंत जे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. ते सोडून कामावर न आलेल्या अशा दहा हजार कर्मचार्याना सुरुवातीला नोटीस पाठवली जाणार आहे. मात्र, आठ दिवसांनंतरही त्यांनी कामावर हजर झाले नाहीत अथवा नोटिसीचे उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई केली जाणार आहे. याबाबत आम्ही राज्य सरकारच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे मंत्री परब यांनी सांगितले.

Leave a Comment