नागपूर | रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होणे आणि त्यामध्ये अडकणे हे सर्वसामान्यांना नविन नाही. मात्र आज नागरपूरात रस्त्यांचे जाळे देशभरात निर्माण करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना चक्क वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यावेळी श्री. गडकरी यांनी स्वतः गाडीतून खाली उतरत वाहतूक सुरळीत केली.
नागपूरच्या पारडी भागात असलेल्या एसआर फंडमधून भवानी हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला. या ऑक्सिजन प्लांटची सुरुवात आज नितिन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार होते. या कार्यक्रमाला पारडीच्या दिशेने जात असताना केंद्रीय वाहतूक मंत्री यांच्या गाडीचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता.
नागपुरात रस्त्यांत वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर चक्क नितिन गडकरी स्वतः गाडीतून खाली उतरले होते. या रस्त्यांवर उड्डाणपुलाचे काम सुरू होते. तसेच अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला होता. त्यामुळे श्री. गडकरी यांनी ठेकेदाराला चांगलेच झापले. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांचीही समजूत काढली.