गोव्याहून राजस्थानला दारू वाहतूक : महामार्गावर सापडल्या 36 हजार बाटल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडद गावच्या हद्दीत हॉटेल राजपुरोहित समोर राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सातारा यांच्या पथकाने गोव्याहून राजस्थानला जाणारी बेकायदा गोवा बनावट विदेशी दारूची वाहतुक करणार्‍या दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारूचे 750 बॉक्स (36 हजार बाटल्या), एक आयशर ट्रक, दोन मोबाईल व 47 काजूच्या टरपलांच्या गोण्या असा एकूण 53 लाख 29 हजार 275 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुकेश मोहनलाल सिसोदिया (वय 39, रा. खजुरिया, ता. हातोड, जि. इंदोर, मध्यप्रदेश) व जितेंद्र भगतसिंग राठोड (वय 36, रा. मेथवाडा, ता. डेपालपूर, जि. इंदोर, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दिलेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून गोव्याहून राजस्थानला गोवा बनावट विदेशी दारूची वाहतुक बेकायदेशीर वाहतुक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क व भरारी पथक सातारा यांना मिळाली. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क व भरारी पथकाने खोदड गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर महामार्गावरून निघालेल्या ट्रकला थांबवून त्यामध्ये पाहणी केली असता ट्रकमध्ये विदेशी दारूचे 750 बॉक्स व दारूचे बॉक्स लपवण्यासाठी वापरलेल्या काजूच्या टरपलांच्या 47 गोणी, दोन मोबाईल असा एकूण 53 लाख 29 हजार 275 रूपयांचा मुद्देमालासह मुकेश सिसोदिया व जितेंद्र राठोड यांना ताब्यात घेऊन अटक केली.

सदरची कारवाई प्रभारही निरीक्षक एन. पी. क्षीरसागर, निरीक्षक संजय साळवी, दुय्यक निरीक्षक किरण बिरादार, रोहीत माने, महेश मोहिते, नितीन जाधव, सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जिवन शिर्के, किरण जंगम, भिमराव माळी, विनोद बनसोडे, राणी काळोखे यांनी केली. अधिक तपास एन. पी. क्षीरसागर करीत आहेत.