Travel India : महिलांनो 8 मार्चला करा देशातल्या ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळी मोफत प्रवेश

0
1
Travel India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel India : ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जतात. कधी दुकानांमध्ये खरेदीवर सूट तर कधी हॉटेल्मध्ये डिसकाऊन्ट मध्ये जेवण. मात्र तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रीय स्मारकांमध्ये महिला दिनानिमित्त मोफत प्रवेश मिळतो. जर तुम्ही या दिवशी फिरायला जायचा विचार करत असाल तर नक्की जा.

खरं तर, 2019 मध्ये, सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना (Travel India) एक खास भेट दिली होती. केवळ या दिवशी भारतीय महिला पर्यटकांनाच नाही तर परदेशी महिला पर्यटकांनाही स्मारकांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. तेव्हापासून दरवर्षी महिला कोणत्याही शुल्काशिवाय भारतातील कोणत्याही स्मारकाला भेट देऊ शकतात.

ताजमहाल

तसे पहायला गेले तर ताजमहालमध्ये जाण्यासाठी प्रत्येकाला 50 रुपये मोजावे लागतात.जर तुम्हाला ताजमहालची (Travel India) मुख्य कबर आतून आणि वरून पाहायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 200 रुपये वेगळे द्यावे लागतात . मात्र आता महिलांना ते पाहण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

लाल किल्ला (Travel India)

लाल किल्ल्यावर सोमवार ते शुक्रवार 60 रुपये प्रति व्यक्ती प्रवेश शुल्क आहे. (Travel India) याशिवाय शनिवार आणि रविवारी 80 रुपये शुल्क आकारला जातो. मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.

कुतुबमिनार

कुतुबमिनार येथे भारतीयांसाठी प्रवेश शुल्क 35 ते 40 रुपये प्रति व्यक्ती आहे. याशिवाय (Travel India) परदेशींकडून ५०० रुपये घेतले जातात. परंतु आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कुतुबमिनारमध्ये सर्व महिलांना प्रवेश विनामूल्य आहे.