Travel: उन्हाळा नकोसा झाला आहे?? तर महाराष्ट्रातील या थंडगार ठिकाणांना द्या भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Trave| मे महिना संपत आला की मान्सूनची चाहूल लागते. कारण जून महिन्यापासून पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात होते. त्यामुळे पर्यटक निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे शोधायला सुरुवात करतात. यातील काही ठिकाणे ही महाराष्ट्रातीलच आणि जवळीलच भागातील असावीत, हे पहिले पाहिले जाते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशी काही पर्यटन स्थळे सुचवणार आहोत, जिथे तुम्हाला निसर्गसौंदर्याचा प्रत्यक्षात अनुभव घेता येईल. या ठिकाणांना भेट दिल्यानंतर तुम्हाला स्वर्गात आल्यासारखे वाटेल. चला तर पाहुयात कोणती आहे ही ठिकाणी?? (Must Visited Places)

कळसूबाई शिखर – पावसाच्या हलक्या सरी बसायला सुरुवात झाली की कळसुबाई शिखरावरील दृश्य अचंबित करणारे असते. चारी बाजूंनी हिरवळ, उंच दिसणारे शिखर, विविध जातीचे दिसणारे प्राणी आणि पक्षी त्यांचा आवाज आपल्याला मनमोहीत करून टाकतो. कळसुबाई शिखर हे ट्रेकिंगसाठी तर सर्वात बेस्ट पर्याय आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीला आवश्यक कळसूबाई शिखरावर जावा.

कसारा घाट – इगतपुरीच्या जवळ एक उत्कृष्ट ठिकाण आहे ते म्हणजे कसारा घाट. या कसारा घाटाला स्वर्गाचा रस्ता ही म्हटला जातो. या घाटातून जाताना प्रवाशांना धबधबे, डोंगर – दऱ्या पाहिला मिळतात. दुधासारखे कोसळणारे धबधबे पर्यटकांना निसर्गसौंदर्याचे अद्भुत घडवतात. पावसाळ्यामध्ये कसारा घाट तर धुक्याखाली झाकला जातो. त्यामुळे बहुतांश पर्यटक हे दृश्य पाहण्यासाठी कसारा घाटात येत असतात.

त्रिंगलवाडी किल्ला – इगतपुरी चा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्रिंगलवाडी किल्ला नक्की पहावा. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3000 मीटर पेक्षा जास्त उंचीवर आहे. तुम्हाला जर कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवायचा असेल आणि इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या. (Travel) ट्रेकिंगसाठी देखील हा किल्ला एक चांगला पर्याय आहे.

भावली धरण – भावली धरण हे एक पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते. याठिकाणी वीकेंडमध्ये सर्वात जास्त गर्दी असते. या धरणावर अनेक जण आपल्या कुटुंबासोबत मित्रांसोबत मजा करण्यासाठी येत असतात. या धरणाच्या आजूबाजूलाच इतरही व्हिजीट करावी अशी प्लेसेस आहेत. ज्याला तुम्ही अवश्य भेट द्यायला हवी.(Travel)

इगतपुरी – महाराष्ट्रात राहून स्वर्ग पाहिजे असेल तर पर्यटकांनी अवश्य इगतपुरीला भेट द्यावी. इगतपुरी मध्ये आपल्याला निसर्गसौंदर्याचे दर्शन घडते. पावसाळ्यात तर इगतपुरी चारी बाजूंनी हिरवीगार दिसते. डोंगरदऱ्या, झाडी, धबधबे हे दृश्य आपल्याला मनमोहीत करून टाकतात. इगतपुरीच्या जवळच इतरही फिरण्यासारखे ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत जाऊ शकता.