Travel : निसर्ग बहरलाय…! आवश्य भेट द्या सावंतावडीतल्या ‘या’ अप्रतिम ठिकाणांना

sawantwadi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel : महाराष्ट्राला निसर्गसंपन्नतेचा समृद्ध वारसा लाभला आहे. एकीकडे सह्याद्रीच्या सुंदर डोंगररांगा , दुसरीकडे कोकणचा समुद्रकिनारा… पावसाळ्यात या निसर्गाचं रुपडं अधिकच खुलून जातं. डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे , जमिनीवर आलेली दाट धुक्यांची चादर तुम्हाला अप्रतिम अनुभव देतील यात शंका नाही. पावसाळ्यातलं हे मनमोहक रूप तुम्हाला अनुभवायचं असेल तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सावंतवाडीतली काही ठिकाणे सांगणार आहोत जिथे तुम्हाला खरा निसर्ग अनुभवता येईल चला तर मग जाणून घेऊया…

मोती तलाव

सावंतवाडीतील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे मोती तलाव. हा तलाव म्हणजे पर्वतांच्या मध्यभागी वसलेला आहे. पावसाळ्यात इथले निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. पावसाळ्यात या तलावाचे सौंदर्य हे बघण्यासारखं असतं कारण हा तलाव पूर्ण ढगांनी अच्छादित होतो. या तलावाचा सभोवताली हिरवळ असल्यामुळे या पॉईंटला खरंतर रोमँटिक पॉईंट म्हणून सुद्धा संबोधले जाते.

आंबोली धबधबा (Travel)

महाराष्ट्र हा डोंगर रांगांनी आणि हिरवाईन नटलेला असल्यामुळे इथे पावसाळ्यात अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते. पावसाळ्यात डोंगरांमधून वाहणारे धबधब्यांचे पाणी तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल. आंबोली येथील धबधब्याबद्दल सांगायचं झाल्यास हा धबधबा समुद्रसपाटीपासून दोन हजार फुटांपेक्षा जास्त उंचावर असलेला धबधबा आहे. सावंतवाडीच्या आजूबाजूला असलेल्या प्रेक्षणीय ठिकाणांमध्ये हा धबधबा मानला जातो. हा धबधबा डोंगराच्या मधोमध आहे. पावसाळ्यात याचे सौंदर्य हे अद्भुत असते . येथे आणि आजूबाजूच्या भागात धबधबे असल्यामुळे तुम्ही छोट्याशा ट्रेकिंगचा (Travel) सुद्धा अनुभव घेऊ शकता. सावंतवाडी आणि आंबोली धबधबा हे अंतर केवळ 22 किलोमीटरचे आहे.

सावंतवाडी पॅलेस

सावंतवाडीच्या हिस्टॉरिकल प्लेसेस मध्ये भर घालणारे ठिकाण म्हणजे सावंतवाडी पॅलेस. 1755 ते 1803 दरम्यान हा अप्रतिम असा राजवाडा (Travel) बांधण्यात आला, डोंगराच्या माथ्यावर असलेला हा सावंतवाडी पॅलेस परदेशी पर्यटकांच्या सुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या महालाभोवती असलेली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. या वास्तूला सुद्धा भेट देण्यासाठी पावसाळा सीजन उत्तम आहे.