कराड | राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तासवडे ग्रामस्थांनी “तळबीड पोलिस स्टेशन” परिसरात वृक्षारोपण केले. पर्यावरण संरक्षणासाठी वक्षसंवर्धन करणे गरजेचे असून त्यांची जपणूकही तेवढीच गरजेची असून तळबीड पोलिसांकडून या वृक्षांची काळजी घेतली जाईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटिल, ह.भ.प. महाराष्ट्र राज्य युवा वारकरी महामंडळ कराड तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, सनी दिक्षित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कराड दक्षिण उपाध्यक्ष सागर देसाई, रोहित कांबळे, राजेंद्र पवार, दत्तात्रय निकम, आरोह कुलकर्णी, अथर्व साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कराडच्या बालगृहातही खाऊ वाटप
कै. क्रांतीवीर माधवराव जाधव मुलांचे बालगृह (निरीक्षणगृह) कराड, येथे मुलांना मास्क व लहान मुलांचे खाऊ वाटप करण्यात आले. अनाथ मुलांना कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचे वाटप करण्यात आले. तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊचेही वाटप करण्यात आले.