मनपा हद्दीतील व्यावसायिकांना आता ट्रेंड लायसन्स बंधनकारक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मनपा हद्दीतील व्यावसायिकांना आता ट्रेंड लायसन्स घ्यावे लागणार आहे. मनपा हद्दीतील 108 प्रकारच्या अस्थापनाची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले असताना शासनाकडून हा परवाना शुल्क आकारणे चुकीचे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या लायसनसाठी व्यवसायिकांना 5 ते 20 हजार रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे.

मनपा हद्दीत व्यावसायिक स्वरूपात चालवण्यात येणारे कोणतेही दुकान किंवा व्यवसाय प्रतिष्टानांना आता जुन्याच परंतु नव्या रूपाचे ट्रेंड लायसन्स काढावे लागणार आहे. महापालिकेच्या अधिनियम 1956 अन्वये लायसन्स असल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही. यासाठी अधिनियमातील कलम एक 342 नुसार महानगरपालिका क्षेत्रात ट्रेंड लायसन घेणे बंधनकारक आहे. 2013 मध्ये राज्य शासनाने व्यावसायिकांना परवाना शुल्क लावण्याचे आदेश दिले होते. परंतु आठ वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात आली नाही.

शहरातील एकशे आठ प्रकारच्या व्यावसायिक आस्थापनांची यादी महापालिकेने तयार केली आहे. त्यानुसार शुल्क लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनपा हद्दीतील धर्मशाळा, ब्युटी पार्लर, पुरवठादार, गोडाऊन, बँकिंग क्षेत्र, सायबर कॅफे, एक्स-रे सेंटर, शॉपिंग मॉल, सजावटीचे सामान विक्रीची दुकान, ज्योतिष,कृषी, मेडिकल, मिनरल वॉटर, पूजा सामग्री, हाउस कीपिंग, पेट्रोल पंप, चित्रपट गृहे, हॉटेल, शोरूम, खाजगी शैक्षणिक संस्था, हेल्थ क्लब, फोटो स्टुडिओ, म्युझिक सेंटर, भाजीविक्रेते, कपड्यांची दुकाने, अस्त्र-शस्त्र दुकाने, मध्ये विक्रीची दुकाने, दुग्ध व्यवसाय या व्यवसायांचा आणि दुकानांचा समावेश आहे.

Leave a Comment