Tri-Nation Women’s T20 Series:भारताला हरवून ऑस्ट्रेलिया बनला चॅम्पियन,स्मृती मंधानाचे अर्धशतक गेले वाया …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची सलामीवीर स्मृती मंधानाचा अर्धशतकीय डाव व्यर्थ ठरला. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या ट्राय नेशन्स टी -२० मालिकेत आज पराभूत झाला.ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने बेथ मोनीच्या अर्धशतकानंतर जोनाथन जोनासेनच्या पाच विकेटच्या मदतीने आज झालेल्या अंतिम सामन्यात भारताला 11 धावांनी पराभूत केले.ऑस्ट्रेलियन संघाकडून मोनीने ५४ चेंडूंत नाबाद ७१ धावा केल्या आणि २० षटकांत ६ गडी गमावून १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिला संघ १४४ धावांवर बाद झाला.स्मृतीशिवाय इतर कोणताही फलंदाज भारतासाठी मोठी खेळी करू शकला नाही.

भारताकडून सलामीवीर स्मृती मंधानाने ६६ धावांची खेळी साकारली. तिची जोडीदार शैफाली वर्मा केवळ १० धावा करू शकली. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रिचा घोषने १७ धावा केल्या तर रॉड्रिग्झ केवळ दोन धावा करु शकली.कर्णधार हरमनप्रीत कौरने १४ धावा केल्या पण तिने मंधानाबरोबर ५० धावांची भागीदारी केली. ही जोडी मैदानावर होती, त्यावेळी भारताला सामना जिंकण्याची आशा होती. भारतीय संघाच्या एकूण ११५ धावा झालेल्या असताना मेगन शटने मंधानाला बाद करून भारताला चौथा धक्का दिला. तीन धावानंतर जोनासेननेही कौरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मंधानाने ३७ चेंडूंच्या आकर्षक खेळीत १२ चौकार ठोकले. यानंतर भारतीय संघाला गुंडाळायला वेळ लागला नाही.

 

तत्पूर्वी, मूनीने एक बाजू लावून धरून ऑस्ट्रेलियाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. मूनीने तिच्या खेळीत नऊ चौकार ठोकले. त्या व्यतिरिक्त ऍशली गार्डनर आणि कर्णधार मेग लेनिंग यांनी २६-२६ धावांचे योगदान दिले. भारताकडून दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले

 

 

 

Leave a Comment