नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
चांदवड तालुक्यातील मातेवाडी भागात पाणी फाऊंडेशनचे काम करणाऱ्यांवर आदिवासी ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात 11 जण जखमी झाले होते. तर अनेक दुचाकी गाड्यांची मोडतोड करून त्या पेटून देण्यात आल्या होत्या. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत ५० जणां विरोधात गुन्हा दाखल केला असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
काल चांदवड तालुक्यातील मातेवाडी जवळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेअंतर्गत ग्रामस्थांमार्फत जलसंधारणाचे काम सुरू होते. शुक्रवारी (ता. ३ ) सकाळी सात वाजेच्या सुमारास तेथे आठ वर्षांपासून राहणाऱ्या व जमीन कसणाऱ्या आदिवासींनी कामास विरोध केला आणि कलुर, गोफण आणि लाठ्याकाठ्यांनी काम करणाराऱयांवर हल्ला चढवला. आदिवासींनी कार्यकर्त्यांच्या गाड्यांची ही मोडतोड करत त्या पेटवून दिल्या. या हल्ल्यात ११ कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मातेवाडी शिवारात पाणी फाउंडेशनच्यावतीने सर खोदण्याचे व कुंटु बांध बांधण्याचे काम गावकऱ्यांनी सुरू केले असता, सकाळी सात वाजेच्या सुमारास संशयितांनी ग्रामस्थांन सोबत वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आदिवासींनी पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा व ग्रामस्थांच्या आठ ते नऊ गाड्यांची मोडतोड करत, त्या पेटवून दिल्या. तसेच तसेच जेसीबीची देखील मोडतोड करण्यात आली. हल्ल्यात भाऊराव चव्हाण, सुरेखा मते, संतोष मते, सागर कावळे आदी जखमी झाले. तसेच जेसीबी ऑपरेटर मोटू प्रमोद व त्याचा सहकारी मुन्ना शहा हे देखील गंभीर जखमी झाले.
मतेवाडी शिवारात नागरिकांनी पाणी फाउंडेशन स्पर्धेअंतर्गत काम हाती घेतले होते. या कामाला स्थानिक आदिवासींकडून विरोध होता. दरम्यान, आदिवासी व माळेवाडी ग्रामस्थांमध्ये समझोता होऊन डोंगराच्या बाजूला चर घ्यावा असे सर्वानुमते ठरले. असे असताना शुक्रवारी अचानक वनविभागाच्या या जमिनीवर शेती करत असलेल्या सुमारे दीडशे ते दोनशे आदिवासी नागरिकांनी काम करणाऱ्या ग्रामस्थांवर दगडफेक करत काम बंद पाडले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणी संतोष मते यांनी दिलेल्या पर्याय फिर्यादीवरून गणपत गुंजाळ, बाबाजी गांगुर्डे, शंकर गवळी ,भाऊराव गांगुर्डे, गुलाब गांगुर्डे, हनुमंत गुंजाळ ,लखन पवार, वालुबा पवार, सुभाष पवार, कचरू गवळी, अंकुश सोनवणे, भाऊसाहेब गुंजाळ, समाधान सोनवणे, शिवाजी वाघ ,तानाजी गोधडे, शिवाजी गोधडे, संजय सोनवणे, बारकू गवळी, सोमनाथ माळी, बाबाजी बर्डे,चेतन सोनवणे,अलका गोधडे, कमलाबाई गुंजाळ, सारिका गुंजाळ, उज्वला गुंजाळ ,उमाजी गुंजाळ ,हिरवाई गोधडे, जयाबाई गोधडे, गोरख माळी, बारकू गोधडे, मच्छिंद्र माळी,जयंतीबाई गवळी आदींसह पंधरा ते वीस संशयितांनी मारहाण केली. त्यानुसार ५० जणांविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.