UPI द्वारे चुकीच्या अकाउंटला पैसे गेले तर घाबरू नका; वापरा ही एक ट्रिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे अगदी काही मिनिटातच आपल्याला पैशांची देवाण-घेवाण करता येते. आपण यूपीआय द्वारे हे पेमेंट करत असतो परंतु कधी कधी आपण गडबडीत UPI द्वारे चुकीच्या खात्यात पेमेंट करतो. परंतु अशावेळी घाबरण्याची काही गरज नाही. तुम्ही अगदी UPI च्या मदतीने तुमचे गेलेले पैसे 48 ते 72 तासांच्या आत परत मिळू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. काही तासातच तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील.

आर्थिक व्यवहार आता ऑनलाइन पद्धतीने होण्यात व्हायला लागलेले असल्याने अगदी लहान मोठे पेमेंट देखील आपण यूपीआयच्या मदतीने करत असतो. भारतातील जवळपास सर्वच बँका त्यांच्या ग्राहकांना यूपीआयची सुविधा पुरवत असतात. जर यूपीआयद्वारे तुमचे पैसे चुकीच्या नंबरवर ट्रान्सफर झाले असतील तर सगळ्यात आधी त्या नंबरवर कॉल करून पैसे परत करण्याची मागणी करा. तसेच तुम्ही पैसे शेअर केलेले स्क्रीनशॉट देखील दाखवू शकता. या पद्धतीने तुम्ही पैसे देखील मिळवू शकता.

परंतु तुम्ही पैशाची मागणी केली असता किंवा स्क्रीन शॉटचा पुरावा दाखवला असता, देखील त्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. तर तुम्ही लगेच यूपीआय केअरशी संपर्क साधा. तुम्ही त्यांच्या कस्टमर केअर संवाद साधा आणि संपूर्ण प्रकरण सांगा. तसेच तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून देखील तुम्ही ही तक्रार सांगू शकता. त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच मदत मिळेल.

तुम्हाला ग्राहक सेवेकडून देखील मदत मिळाली नाही. तर तुम्ही एनसीपीच्या पोर्टलवर तक्रार करू शकता. आणि तिथे जाऊन गेटिंग कॉन्टॅक्ट लिंकवर क्लिक करा आणि सर्व माहिती सबमिट करा. आणि तुमची तक्रार विभागाखाली तुमच्या व्यवहाराच्या सगळ्या डिटेल्स इंटर करा. यूपीआय ट्रांजेक्शनची तारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर एंटर करा चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केलेले पैसे हा पर्याय निवडा. आणि सबमिट करा. त्यानंतर काही तासातच तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतील.