भाजप पराभवाबाबत ममता बॅनर्जींनी केले ‘हे’ मोठं विधान, म्हणाल्या कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिल्लीत मोदी सरकारच्या विरोधात सर्व पक्ष एकवटलेले आहेत. विरोधकांकडून आगामी 2024 च्या निवडणुकीत मोदी सरकारला पराभूत करण्याबाबत रणनीती आखली जात असताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप पराभवाबाबत महत्वाचे विधान केले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाचा पराभव करु. विधानसभा निवडणुकीत जी स्थिती झाली तशीच स्थिती लोकसभा निवडणुकीत होईल,” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, बंगाल जो आज विचार करतो तोच विचार उद्या देश करतो. 2024 लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाचा पराभव करु. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा राज्यात केलेला प्रचार आपण सर्वांनी पाहिला. प्रत्येकजण त्यांना घाबरत होता. पण राज्यातील जनतेने त्यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीत जी स्थिती झाली तशीच स्थिती लोकसभा निवडणुकीत होईल.

भाजपाचा संपूर्ण देशभर पराभव झाल्याचे मला पहायचे आहे. पुन्हा एकदा ‘खेला होबे’ होणार आहे. राज्यात उद्योग आणि रोजगार आणण्यासाठीच आपण सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलो असल्याचं यावेळी ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

Leave a Comment