तिहेरी अपघात : साताऱ्यात ट्रक, चारचाकी व दुचाकीच्या अपघातात एकजण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील आज शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टारंट चाैकातील सेवा रस्त्यावर वाहनांचा तिहेरी भीषण अपघात झाला आहे. कोबी घेऊन जाणारा ट्रक, चारचाकी व एका दुचाकींचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील पुणे- बंगळूर महामार्गाजवळील सेवा रस्त्यांवर हा अपघात झाला आहे. कोल्हापूरवरून पुण्याकडे कोबी घेवून जाणाऱ्या ट्रक क्रमांक (केए- 02- ए एम- 2215), चारचाकी क्रमांक (एमएच- 11- पीजी- 2915) आणि दुचाकी क्रमांक (एमएच- 11 -बीएक्स- 9459) या वाहनांचा तिहेरी अपघात झाला. या अपघातानंतर चारचाकी शेजारील उभा असलेल्या पत्र्यावर गेली. चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले असून ठप्प असलेली वाहतूक सुरळीत केलेली आहे. या अपघातात दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची अोळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघात पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

ट्रक चालकांचा ताबा सुटल्याने अपघात

कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या ट्रकमध्ये कोबी होते. या ट्रकचालकांचा ताबा सुटल्याने महामार्गावरील बॅरिगेट तोडून ट्रक सेवा रस्त्यांवर आला. यावेळी या ट्रकने एका चारचाकी व दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. यामध्ये दुचाकी व चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. तर एक पिकअप अपघातातून थोडक्यात बचावली असल्याची माहीती घटनास्थळांवरील पोलिसांनी दिली.

Leave a Comment