रायगडमध्ये वऱ्हाड्यांच्या ट्रकला अपघात ; ट्रक 300 फूट दरीत कोसळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला पोलादपूरजवळ भीषण अपघात झाला आहे. वऱ्हाडाने भरलेला ट्रक सुमारे ३०० फूट दरीत कोसळला असल्याची माहिती समोर आली असून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार जणांचे मृतदेह हाती लागले असून अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस, ट्रेकर्स रवाना झाले आहेत. घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साधारण 6.30 च्या सुमारास काही वऱ्हाड्यांचा ट्रक रत्नागिरीतून पोलादपूर येथे येत होता. त्यावेळी पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील अपघाती वळणावर या ट्रकला भीषण अपघात झाला. या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या ट्रकमध्ये जवळपास 20 ते 25 लोक प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडली असल्याने बचाव कार्यादरम्यान अडथळा येत आहे.

जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. तसंच रक्ताची गरज भासेल यासाठी ब्लड बँकेलाही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment