ट्रक अन् डंपरची समोरासमोर भीषण धडक; तिघेजण गंभीर जखमी

सांगली | मिरजेतील मिरज म्हैसाळ मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोनही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या ट्रक मधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

आज दुपारच्या सुमारास सदरचा अपघात झाला. मिरज-म्हैसाळरोडवर ट्रक वड्डीकडे येत होता तर दुसरा ट्रक म्हैसाळकडे निघाला होता. या दोनही ट्रकची मालती तपोवन येथे समोरासमोर धडक झाली. ट्रकचा व डंपर समोरील भाग पूर्णपणे उध्दवस्त झाला.

यामध्ये चालक रविंद्र दशरत कांबळे, प्रकाश जानकी माथूर, डंपर चालक मईनाबाई दादाहरी शिंदे हे गंभीर जखमी झाले. या सर्वांना मिरज शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे.