महामार्गावर ट्रक- आयशरचा भीषण अपघात : केबिनमध्ये चालक आडकला

Pune-Bangalore Highway Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पुणे- बंगलोर महामार्गावर वराडे (ता.कराड) गावाजवळ आज दुपारी ट्रक व आयशरचा भीषण अपघात झाला. यामध्ये आयशरचे मोठे नुकसान झाले असून चालक गाडीतच अडकला होता. सुदैवाने, जीवितहानी झाली नाही, मात्र आयशरच्या चालकाला गाडीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ ट्रकला पाठीमागून आयशरने (क्र.- MH- 12-DG-8083) जोराची धडक दिली. वराडे गावच्या हद्दीत आज दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. साताराहून कराडच्या दिशेला जाणाऱ्या लेनवरती अपघात झाला.

ट्रकला पाठिमागून आयशरने धडक दिल्याने चालक केबिनमध्ये आडकला होता. त्याला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून कराड येथे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आयशरचा चालक गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी तळबीड पोलिस स्टेशन व हायवे हेल्पलाईनचे कर्मचाऱ्यांनी मदत केली.