ट्रक- चारचाकीचा पुणे- बंगळूर महामार्गावर अपघात : सेलोराचे मोठे नुकसान

कराड | पुणे- बंगळूर महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे ट्रक आणि चारचाकी गाडीचा जोरदार अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले असून दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर हायवेवर चारचाकी गाडी मध्येच उभी असलेल्या स्थितीत आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बंगळूर महामार्गावर ट्रक आणि चारचाकी सेलोरो गाडी (क्र. MH- 12- SL- 8161) अपघात झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी चारचाकी गाडी आहे, मात्र ट्रक नसल्याचे दिसून आले आहे. सेलोरो गाडीतील आयुषी जनगाळ (वय- 27) व अभिषेक वासुदेव माने (वय- 25, दोघेही रा. सुसगाव- पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

कोल्हापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातातील दोघांनाही कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती पोलिस घेत असून अद्याप गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे कराड शहर पोलिसांनी सांगितले.