स्कुटीचालक महिलेचा भीषण अपघात! 3 किमी ट्रकने फरफटत नेलं अन्….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका 20 वर्षीय तरुणीला कारने तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत (accident) नेल्याची घटना ताजी असताना अशाच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये एका स्कूटी चालक महिलेला ट्रकने धडक देऊन तिचा मृतदेह तीन किलोमीटरपर्यंत फरफटत (accident) नेला आहे. यानंतर हि महिला स्कुटीसह ट्रकमध्ये अडकली. यादरम्यान ट्रकने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आणि ती त्यामध्ये जळून खाक झाली.

या अपघाताची (accident) माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर त्यांनी पीडितेचा मृतदेह ट्रकमधून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या अपघातातील पीडित महिला हि एका विद्यापीठात लिपिक पदावर कार्यरत होती. मृत महिलेचं नाव पुष्पा असे आहे.

पुष्पा या घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी त्या स्कूटरवरून जात असताना ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर ट्रकने त्यांना 3 किमी पर्यंत ओढत नेले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न (accident) केला पण ट्रकचालक काही थांबला नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मृत पुष्पा या मूळच्या लखनऊ येथील रहिवासी होत्या. या घटनेनंतर आरोपी ट्रकचालक फरार झाला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी