वृत्तसंस्था । अमेरिकेने ( America) एच -१ बी व्हिसावरील (H-1B visa) काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) प्रशासनाने म्हटले आहे की, व्हिसाधारकांना निवडक प्रकरणात अमेरिकेत येण्याची परवानगी मिळावी म्हणून नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आयटीआयमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लॉकडाउन आधी जे काम करत होते, त्याच नोकरीसाठी H-1B व्हिसाधारकांना अमेरिकेत परतायचे असेल तर, त्यांना परवानगी देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. व्हिसावरील निर्बंध शिथिल करताना H-1B व्हिसाधारकाच्या पत्नीलाही अमेरिकेत परतण्याची परवानगी दिली आहे. H-1B व्हिसावरील निर्बंध शिथिल करण्याचा भारतीयांना सर्वाधिक फायदा होईल. H-1B हाच व्हिसा घेऊन भारतीय अमेरिकेत जातात तसेच याच व्हिसावर भारतीय मोठया संख्येन तिथे नोकरी करतात.
United States government announces relaxations in some rules for H-1B visas. pic.twitter.com/fU4ff6rsJg
— ANI (@ANI) August 12, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांनी २२ जून रोजी परदेशी नागरिकांना अमेरिकेत रोजगाराची संधी देणाऱ्या H-1B सह वेगवेगळया व्हिसांवर बंदी आणली होती. या व्हिसामुळे अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या संकटात येतात असा ट्रम्प यांचा दावा आहे. करोना व्हायरसमुळे अमेरिकेत लॉकडाउन होता. त्यामुळे तिथे मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अशा काळात तिथल्या लोकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी वेगवेगळया व्हिसावर बंदी आणली होती. पण आता त्यांनी H-1B व्हिसाधारकांना दिलासा दिलाय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”