ट्रम्प यांनी केला आपल्या भाषणात सचिन-विराटचा उल्लेख, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. आज सकाळी ११.४० च्या सुमारास डोनाल्ड ट्रम्प यांचं एअरफोर्स वन विमान अहमदाबाद विमानतळावर दाखल झालं. मोदींनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर यांच्यासह त्यांच्या सरकारमधील उच्चपदस्थांचा शिष्टमंडळात समावेश आहे.

दरम्यान ट्रम्प यांनी अहमदाबाच्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम मोटेराचे उदघाटन केले. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोटेरावरील आयोजित कार्यक्रमात उपस्थित जनतेला संबोधित केलं. मोटेरा स्टेडियम खूपच भव्यदिव्य आहे. जगातील सर्वात मोठं मैदान असून खूपच सुंदर आहे. भारतानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. असं ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले.

आपल्या भाषणाची सुरुवात ट्रम्प यांनी नमस्ते म्हणत केली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणांमध्ये बॉलिवूड चित्रपट, कलाकार आणि क्रिकेटच्या खेळाडूंचा उल्लेख केला. शाहरूख खानचा दिलवाले दुलहनियां ले जाएंगे या चित्रपटाचा उल्लेख करत ट्रम्प यांनी बॉलिवूड चित्रपटाचा चाहता असल्याचं सांगितलं . तर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यापासून मी खूप प्रभावित झालो आहे असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. यासोबतच ट्रम्प यांनी आपल्या भाषणात होळी, दिवाळी, भांगडा डान्सचाही उल्लेख केला.

भारत आणि अमेरिकेची मैत्री आजपर्यंतची सर्वात दृढ मैत्री आहे. भारतामध्ये विविधतेत एकता आहे. येथील लोक जगात एक उदाहरण आहेत असंही तयावेळी म्हणाले. तुम्ही आज दिलेला सन्मानाने भाराहून गेलो आहे. हा सन्मान प्रत्येक अमेरिकन नागरिकांच्या ह्रदयात राहिल. भारतानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. गॉड ब्लेस इंडिया, गॉड ब्लेस अमेरिका, वी लव यू इंडिया, असे भाषणाच्या अखेरीस ट्रम्प म्हणाले.

अहमदाबादमधील नियोजित कार्यक्रम आटोपून डोनाल्ड ट्रम्प आग्र्यातील ताजमहाला भेट देणार आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २४ फेब्रुवारी रोजी आग्रा येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करतील. तसेच अमेरिकन राष्ट्रपतीना ताजमहाल भेटीत कंपनी देतील.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.