हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितले होते कि , आम्ही भारतावर आणि इतर देशावर टॅरिफ लावणार आहोत. 4 मार्च 2025 पासून ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, चीनवर 10% अतिरिक्त टॅरिफ लागू झाला आहे. तर आता 2 एप्रिल पासून भारतावर आयातशुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लागू करणार असल्याची घोषणा झाली आहे. भारत अमेरिकेच्या मालावर जेवढा कर आकारतो , तेवढाच कर आता अमेरिका भारताच्या कंपन्यांवर लावणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतावर कसा आणि काय परिणाम होणार आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत.
ग्राहकांच्या खिशावर परिणाम –
आपण दुसऱ्या देशातून जो माल आयात करतो त्यावर द्यावी लागणारी रक्कम होय. थोडक्यात सांगायचे झाल्यास इतर देशाकडून येणाऱ्या मालावर लावलेला कर म्हणजे टॅरिफ. जर उदाहरणाच्या स्वरूपात पाहायचे झाल्यास , जर आपण अमेरिकेकडून एखादी वस्तू आयात करत असून अन त्याची किंमत 150 रुपये असेल. तर भारताला 50 रु जास्त द्यावे लागतात. यामुळे ग्राहकांना ती वस्तू खरेदी करताना जास्त पैसे द्यावे लागतात. याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम ग्राहकांच्या खिशावर होताना दिसून येतो. प्रत्येक देश आपल्या देशातील उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी टॅरिफ लावतात.
तुम्ही जसे कराल तसे मी करतो –
रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजेच “Tit for Tat” (तुम्ही जसे कराल तसे मी करतो) हे धोरण. याचा अर्थ असा की, जर एका देशाने दुसऱ्या देशाच्या मालावर टॅरिफ (शुल्क) लावले, तर दुसरा देशही त्याच प्रमाणात टॅरिफ लावू शकतो. उदाहरणार्थ, जर भारताने अमेरिकेच्या कारवर 70% कर लावला, तर अमेरिकेने भारताच्या कारवरही तितकाच कर लावत असते. ट्रंप सरकारने रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अमेरिका आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होईल. ट्रम्प यांच्या मते, हे धोरण अमेरिकन उत्पादनांना चालना देईल, रोजगार वाढवेल, आणि अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल .
भारतीय उत्पादनांवर परिणाम –
ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ निर्णयामुळे भारतीय उत्पादनांवर परिणाम होईल, आणि याचा व्यापारी तुटीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने अमेरिकेला फायदा होईल. मात्र, यामुळे भारताच्या निर्यातीसाठी काही आव्हाने उभी राहतील, आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ते आर्थिक दृष्ट्या चांगले नसू शकते. रेसिप्रोकल टॅरिफमुळे भारतातील काही उत्पादने जसे की खाद्य उत्पादने, कापड, औषधे, वाहने इत्यादी महाग होऊ शकतात. भारत अमेरिकेच्या उत्पादने स्वस्त दरात आयात करतो, परंतु रेसिप्रोकल टॅरिफ लागू झाल्यानंतर भारतीय बाजारपेठेतील ट्रेड सरप्लस कमी होऊ शकतो. जर भारताने अमेरिकन वस्तूंवर टॅरिफ कमी केला, तर अमेरिकन वस्तू भारतीय बाजारात स्वस्त होऊ शकतात, ज्यामुळे त्यांची आयात वाढू शकते. टॅरिफ लागू होण्यामुळे आयात वाढेल, ज्यामुळे डॉलरची मागणी वाढेल आणि रुपया कमजोर होईल. त्यामुळे भारताचे आयात बिल वाढेल. अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.