वाधवान कुटुंबियांना परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्तांची नार्को टेस्ट करा – तृप्ती देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी सकलेन मुलाणी

येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबिय गृहखात्याच्या प्रधान सचिवांच्या पत्राद्वारा लोणावळ्याहून पाचगणीत दाखल झाले होते. सदर प्रकार माध्यमांत आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबियांना परवानगी देणार्‍या प्रधान सचिव गुप्ता यांच्यावर कारवाई करत सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र तरिही विरोधकांकडून सरकारव टिके होत आहे. अशात आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पाचगणीला वाधवन कुटुबियांना पोहचविणार्‍या अधिकार्‍यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणातील अधिकारी अमिताभ गुप्ता यांना रजेवर पाठविण्याऐवजी त्यांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरूण वाधवन कुटुंबिवयांना कोणत्या मंत्र्याने पत्र दिले हे समोर येईल, असे कित्येक व्हीआयपींना पास दिले आहेत ते सुध्दा समोर येणे गरजेचे असल्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. कायदा समान असताना गरिबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय कसा देता येतो हे या प्रकरणावरून स्पष्ट होते आहे असंही देसाई यांनी म्हटले आहे.

यावेळी, अनेक कुटुंबीय वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकले आहेत, परंतु कोरोनाला राज्यातून हद्दपार करायचं आहे म्हणून सर्वसामान्य कुटुंब लॉकडाऊनच्या परिस्थितीत शांत आहेत, सहन करत आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी सर्वसामान्य बाहेर निघाल्यावर अनेक ठिकाणी पोलिसांचा चोपसुद्धा सर्वसामान्यांना सहन करावा लागला आहे. परंतु श्रीमंत वाधवन कुटुंबांना गृहमंत्रालयाकडून पास दिले जातात, वाधवान प्रकरण हे तेथील स्थानिकांच्यामुळे बाहेर आले आहे, परंतु अशा अशा कित्येक श्रीमंत कुटुंबांना गृह मंत्रालयातून व्हीआयपी पास दिले गेले आहेत? याची चौकशी होणे गरजेचे आहे असं तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

वाधवान कुटुंबीयांवर आम्ही किती सजग आहोत हे दाखविण्यासाठी गुन्हे दाखल केले जातील, त्यांच्या गाड्या जप्त केल्या जातील, परंतु या सर्वांचा सूत्रधार कोण? हे कळू नये म्हणून काही दिवसांनी हे प्रकरण शांत होऊन दाबले जाण्याची दाट शक्यता आहे.सरकारच्या अनेक चांगल्या गोष्टींचे आम्ही समर्थन आणि स्वागत केले आहे. परंतु सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल तर बोललेच पाहिजे. अन्यथा यापुढे श्रीमंतांनाच न्याय मिळत राहील आणि गरिबांवरील अन्याय वाढतच जाईल असे मत देसाई यांनी व्यक्त केले आहे.

अमिताभ गुप्तांची नार्को टेस्ट करा - तृप्ती देसाई | Trupti Desai | Abhinav Gupta | Vadhwan Family

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment