पृथ्वीराज बाबा तुम्ही फक्त काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे सांगा..कोण रोखतयं बघूच – तृप्ती देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणार्‍या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आजीवन बंदी घालण्यात आल्याचे वृत्त होते. चव्हाण यांनी देवस्थानांकडील सोने कर्जरुपाने घेऊन कोरोनाविरोधातील लढाई लढावी असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर समाजातील काही जणांकडून त्याला विरोध करत चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आता चव्हाण यांची बाजू घेत भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई पुढे आल्या असून पृथ्वीराज बाबा काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे फक्त सांगा..कोण रोखतयं ते बघूच असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कोणी जर आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांना आणि त्यांच्या परिवारांना काहीही कारण नसताना आजीवन बंदी घातली असे सांगत असेल, धमकी देत असेल तर मला त्यांना एवढेच सांगायचं की आपला देश संविधानानुसार चालतो. या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, आणि “आम्ही बंदी घातली असे सांगून मंदिर तुमच्या मालकीचे आहे असे समजू नका”… मंदिर हे सर्व भक्तांचे असते आणि हे शिवशंकराचे मंदिर आहे असे म्हटले आहे. आज देव मुर्तीस्वरूपात आहे. जर देव खरोखरच जिवंत स्वरूपात असता तर मंदिरात बंदी घालणार्यांना नक्कीच शिक्षा दिली असती असं मत देसाई यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, देवाला सगळे भक्त समान असतात. केवळ राजकारण म्हणून एखाद्याला मंदिरात बंदी असं कोणी जर म्हणत असेल तर “पृथ्वीराज बाबा तुम्हाला कधी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जायचे फक्त सांगा ही तृप्ती देसाई तुम्हाला त्या मंदिरात तुमच्या कुटुंबासह घेऊन जाईल..कोण रोखतयं ते बघूच.” कोणी आवाज उठवला तर तो दाबण्याचे षड्यंत्र सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही असे म्हणत देसाई यांनी इशारा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment