थंडीत पायाच्या भेगांमुळे त्रस्त झाला असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – हिवाळ्यात ओठ फुटणे, पायांना भेगा पडणे (cracked heels) या गोष्टी घडत असतात. या समस्या जरी छोट्या असल्यातरी याचा परिणाम आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होतो. भेगा पडलेल्या टाचा (cracked heels) बऱ्या व्हाव्यात, त्यापासून आराम मिळावा यासाठी अनेक लोक पैसे खर्च करून बरेचशे उपाय करत असतात. आज आपण या त्रासाचे निवारण करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत. या उपायांचे नियमितपणे पालन केले तर टाचांना भेगा पडण्याची (cracked heels) समस्या टाळता येऊ शकते. चला तर मग पाहूया उपाय

1) हील बाम
टाचांना पडलेल्या भेगांचा (cracked heels) त्रास दूर करायचा असेल तर तुम्ही हील बामचा वापर करू शकता. या बाममध्ये, युरिया, सॅलिसिलिक ॲसिड, अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड आणि सॅकराइड आयसोमिरेट यांसारखे घटक असतात.

2) लिक्विड बँडेज
भेगा पडलेल्या टाचा (cracked heels) आणि इन्फेक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही लिक्विड बँडेजचासुद्धा वापर करू शकता. हे प्रॉडक्ट स्प्रेच्या स्वरूपातदेखील तुम्हला मिळेल. भेगा पडलेल्या टाचांच्या दुरुस्तीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

3) मध
मध हा सगळ्या आजारांवर उत्तम उपाय मानला जातो. मध हा केवळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नव्हे तर भेगा पडलेल्या टाचांसाठीही (cracked heels) उपयुक्त ठरतो. टाचांच्या भेगांपासून आराम मिळवण्यासाठी मधाचा वापर करणे फायदेमंद ठरू शकतो.

4) नारळाचे तेल
कोरडी त्वचा, खाज सुटणे आणि सोरायसिस यांसारख्या त्वचारोगांवर उपचार करण्यासाठी नारळाचे तेल उपयुक्त मानले जाते. खोबरेल तेलामध्ये आढळणाऱ्या अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबिअल गुणधर्मांमुळे टाचांना पडलेल्या भेगांपासून (cracked heels) तुम्हला आराम मिळण्यास मदत होईल.

(टीप : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. यापैकी कोणताही उपचार करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. )

हे पण वाचा :
Flipkart वर 21,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 11
दुधारू जनावरांचा विमा काढल्यास मिळणार 88 हजार रुपये नुकसान भरपाई, जाणून घ्या किती असणार प्रिमिअम
कठोर परिश्रम करू, पुन्हा लढू; गुजरात निकालावर राहुल गांधींचे Tweet
केवळ 10 रुपयांमध्ये करा आता 150 किलोमीटरचा प्रवास, आझमगडच्या तरुणाचा अप्रतिम शोध
भाजपच्या विजयानंतर मोदींचे Tweet; नेमकं काय म्हणाले?