फलटण | कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या जमिनीबाबत काही समस्या राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. याबाबत लवकरच महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा करून आगामी काळात प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयास भेट देऊन या महाविद्यालयांच्या कामकाजाची शरद पवारांनी माहिती घेतली. तसेच गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या वतीने मुरघास उत्पादन व मुक्त संचार गोठा पद्धतीची सविस्तर माहिती डॉ. शांताराम गायकवाड यांनी यावेळेस दिली.
या वेळी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, बारामती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव आदी उपस्थित होते.