अतिवृष्टीमुळे महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ; कुलगुरूंचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संलग्नित महाविद्यालय विद्यापीठाच्या मुख्य व परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जाहीर केला आहे. संदर्भात 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या अधिसभेत च्या बैठकीत काही सदस्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. तेव्हा कुलगुरूंनी यासंदर्भात सहानुभूतीने कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील परिस्थिती जाणून घेतल्यानंतर गुरुवारी कुलगुरूंचा आदेशानुसार शैक्षणिक विभागाने शैक्षणिक शुल्क माफी चे परिपत्रक जारी केले आहे. विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद येथील महाविद्यालये, औरंगाबाद येथील विद्यापीठाच्या मुख्य उस्मानाबाद येथील उप परिसरातील विद्यार्थ्यांचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील फक्त शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. केंद्र, राज्य तसेच तत्सम प्राधिकरणाच्या शिष्यवृत्ती मिळणारे विद्यार्थी वगळून उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे.

हा आर्थिक भार महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाने संस्थेच्या एकत्रित निधीतून तर विद्यापीठाने आपल्या एकत्रित निधीतून उचलण्याच्या सूचना विद्यापीठाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment