तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; गेल्या १० वर्षातील ही १५वी बदली आता ‘या’ ठिकाणी होणार रुजू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे (tukaram mundhe) यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (maharashtra jeevan pradhikaran) सदस्य सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या १० वर्षातील त्यांची ही १५वी बदली आहे. नवी मुंबईपाठोपाठ नागपूर पालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची कारकिर्द वादळी ठरली होती. कडक शिस्तीच्या आणि स्वभावाच्या मुंढेंनी नागपुरातील राजकारण्यांनाही न जुमानता त्यांची कार्यपद्धती सुरू ठेवल्याने त्यांच्याविरोधात राजकारण्यांमध्ये प्रचंड रोष होता.

काही दिवसांपूर्वी नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची बदली केली गेली असावी असं बोललं जातं. दरम्यान, गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंढे यांची बाजू घेतली होती. तरीही त्यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान,आज मुंढे यांच्यासह सात सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूरचे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कैलास जाधव यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एस. एस. पाटील यांची सिडकोचे ज्वॉइंट एमडी, डॉ. एन. बी. गीते यांची एमएसईडीचे संचालक, अविनाश दुखणे यांची वाहतूक आयुक्त, एस. एम. चन्ने यांची एमएसआरटीसीवर, रामास्वामी यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment