Tulip Wind Turbine : आता वीजबिलाची कटकट मिटणार; फक्त घराच्या छतावर बसवा ‘हे’ उपकरण

Tulip Wind Turbine Light Bill (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tulip Wind Turbine। भारतातील मोठ्या ग्रामीण भागात अजूनही विजेचे संकट आहे. देशाच्या काही भागात अजूनही जनतेला वीजपुरवठा सुरळीत होत नाही. तर दुसरीकडे ज्यांना वीज मिळतेय ते वाढीला वीजबिलामुळे त्रस्त आहेत. सरकारकडून गेल्या काही महिन्यात अनेकदा वीजबिले वाढवण्यात आले आहेत. याच थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. काहीजण विजेच्या बचती साठी घरावर सौर पॅनल बसवतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही घराच्या छतावर बसवल्यानंतर दरवर्षी तुम्ही ३० ते ४० हजारांपर्यंत वीजबिलाची बचत करू शकता. आणि त्याचा बसवण्याचा खर्चही सोलर पॅनल पेक्षा कमी आहे. हे उपकरण नेमकं काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रानो, आज आम्ही तुम्हाला ज्या उपकरणाबाबत सांगत आहोत त्याच नाव आहे ट्यूलिप टर्बाइन… (Tulip Wind Turbine) हे एक पवन ऊर्जा जनरेटर आहे. खरं तर पवन ऊर्जा खर्चिक असलयाने कोणी त्याचा वापर करत नाही. परंतु यासाठी एकदाच पैसे खर्च केल्यास आयुष्यभर तुम्हाला कमी लाईट बिल येऊ शकेल. म्हणजेच हे एक वन टाइम इन्व्हेस्टमेन्ट टर्बाइन आहे जे तुम्ही तुमच्या घराच्या छतावर लावू शकता. त्यात एक पॉवर जनरेटर बसवला आहे ज्याच्या मदतीने वीज निर्मिती सुरू होते. जेव्हा हवा ट्युलिप टर्बाइनच्या पंखांवर आदळते तेव्हा या टर्बाईनचे ब्लेड फिरतात आणि या पंख्यांमधून जनरेटर चालू होऊन वीजनिर्मिती सुरु होते. .

ट्यूलिप टर्बाइनसाठी खर्च किती : Tulip Wind Turbine

महत्वाची बाब म्हणजे वाऱ्याचा वेग कमी असला तरी सुद्धा याद्वारे वीज निर्मिती होऊ शकते. एकदा वीज निर्मिती सुरू झाली की, तुम्ही ती बॅटरीच्या मदतीने किंवा थेट तुमच्या घरात वापरू शकता. हे टर्बाइन फुलांच्या ट्यूलिपसारखे दिसते, म्हणून त्याला ट्युलिप टर्बाइन असे नाव देण्यात आले आहे. याच्या खर्चाबाबत सांगायचं झाल्यास, साधारणपणे ट्यूलिप टर्बाइन बसवण्यासाठी 50 हजार ते 2 लाख रुपये खर्च येतो. परंतु एकदा का हे टर्बाईन बसवलं कि मग वर्षाकाठी तुम्ही अंदाजे ३० ते ४० हजारांची बचत करू शकता.