समृद्धी महामार्गावरील बोगद्याचे काम अजून अडीच महिन्यावर…

road
road
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले होते. यातच आता काही नियम शिथिल करून ग्रीन झोन मधील शहर अनलॉक करण्यात आले आहे. यामुळे लवकरच समृद्धी महामारर्गावरील बोगदा तयार होणार आहे.अनलॉक नंतर आता परप्रांतीय मजूर हळूहळू समृद्धी महामार्गाच्या कामावर परत येऊ लागले आहेत. आता लवकरच समृद्धी महामार्गावरील बोगदा तयार होईल. अशी माहिती विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बी पी साळुंखे यांनी दिली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील 112 किलोमीटर लांबीचा ‘सुपरफास्ट एक्सप्रेस वे’ म्हणजेच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जात आहे. अडीच महिन्यात तयार होईल समृद्धी वरील बोगदा परप्रांतीय मजूर येऊ लागले परत अनुभव नंतर हळूहळू आली कामाला गती घेतली आहे. बोगदा, इंटरचेंज, अंडरपास आणि रस्त्याच्या कामाचे हळूहळू गती घेतली आहे. त्याचबरोबर येत्या दोन अडीच महिन्यात बोगद्याच्या दोन्ही बाजू वाहतुकीसाठी सज्ज होतील असं ही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनमुळे चौदा महिन्यापासून या रस्त्याचे काम खोळबले होते.अनेक परप्रांतीय मजूर गावी गेले तर अलीकडे शासनाने रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी प्राधान्य दिल्यामुळे महामार्गाची अनेक कामे खोळंबली होती. या सहापदरी महामार्गावर रस्त्याचे बऱ्यापैकी काम पूर्ण झाले आहे. माळीवाडा आणि सावंगी इंटरचेंज तर लासुर स्टेशनजवळ रेल्वे ओवरब्रिज काम प्रगतिपथावर आहे. तालुक्यातील पोखरी शिवारात बोगदा उभारण्यात आला असून भुयारी मार्ग उभारला जात आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूसाठी सामान की इंटरचेंज पूर्वेला पोखरी शिवारात डोंगर करण्यात आला आहे.

कामावरील परप्रांतीय मजुर होळीच्या सणासाठी त्यांच्या गावी गेले होते. डिसेंबर 2020 मध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली होती. या कामासाठी एमएसआरडीसी या कंत्राटदार कंपनीला 90 दिवसांची मुदत दिली होती. परंतु फेब्रुवारी पासून कोरोना सुरू झाला आणि कामाची गती मंदावली होती. त्यानंतर मार्चमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यामुळे ते मजूर परत आलेच नाहीत. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात ही मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर गावी गेले होते. मनुष्यबळाची कमतरता वाढल्यामुळे या महामार्गांच्या कामाची गती मंदावली. सध्या अनलॉक झाले आहे परंतु रेल्वेसेवा सुरू झालेली नाही त्यामुळे कंत्राटदार संस्थांनी स्वखर्चाने बस पाठवून मजुरांना आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्याच्या आतील बाजूचे मजबुतीकरण पूर्ण होण्यासाठी दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.