Tur Cultivation | ‘या’ पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळेल बक्कळ नफा, अशाप्रकारे करा शेती

Tur Cultivation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tur Cultivation | जून महिना सुरू झाला की, शेतकरी अनेक पिकांची लागवड करतात. कारण या महिन्यात सहसा जास्त पाऊस नसतो. त्यामुळे पिकाला योग्य तेवढे पाणी मिळते. जूनमधील पहिले पंधरा दिवस हे तुरीच्या लागवडीसाठी खूप महत्त्वाचे असतात. हिवाळ्यात देखील तुरीची लागवड केली जाते. परंतु जर तुम्ही योग्य नियोजन करून तुरीची लागवड केली तर तुम्ही तुरीचे (Tur Cultivation ) खूप चांगले पीक घेऊ शकता. हे शेतीसाठी खूप फायदेशीर आहे.

याबाबत हजारीबाब येथील कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर आर के सिंग हे म्हणाले की, हवामान आणि शेतीवर तुरीचे पीक अवलंबून असते. शेतकरी त्यांच्या शेतात पुसा जातीचे बियाणे लावू शकता. तुम्ही जर तुरीच्या पुसा जातीची बियाणे शेतात लावली, तर यातून तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.

लागवड कशी करावी? | Tur Cultivation

तुरीची लागवड करण्यासाठी शेतीची योग्य निवड करावी लागेल. ज्या ठिकाणी माती चिकनमाती असेल, त्या ठिकाणी तुम्हाला लागवड करावी लागेल. तसेच ज्या भागात एका ठिकाणी पाणी साचणार नाही. त्या ठिकाणी लागवड करावी लागेल. कारण तूरीच्या लागवडीसाठी जास्त पाणी चालत नाही.

किती उत्पादन होईल?

भारतात शेतकरी प्रति एकर 6. 8 क्विंटल तुरीचे उत्पादन शेतकरी घेऊ शकतो. हे उत्पादन खूप कमी आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे योग्य बियाण्यांचे निवड न करणे. तुम्ही योग्य पद्धतीने पिकांचे उत्पादन घेतले, तर तुम्ही दहा क्विंटलपर्यंत हे उत्पादन घेऊ शकता. बाजारात तुरीला वर्षभर मागणी असते. तसेच तुरीच्या भावात देखील वाढ झालेली असते. तुरीची उत्पादन 120 दिवसांमध्ये होते. तुम्ही वर्षभरात दोन वेळा पीक घेऊन शेतीतून खूप चांगले पीक घेऊ शकता.