कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
मराठी भाषिकांना अक्षरशः भुरळ घालणारी झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेने आता चित्रीकरणाच ठिकाण बदललं आहे. गेल्या ४ वर्षापासून कोल्हापूरच्या वसगडे या छोट्याश्या खेडे गावात सुरू असणाऱ्या या मालिकेचं चित्रीकरण आता कोल्हापूरच्याच केर्ली गावात सुरू झालंय. नवीन वर्षात नवीन जागी अर्थात केर्लीच्या दौलत वाड्यात. तुझ्यात जीव रंगाला मालिकेचा पुढील प्रवास आता केर्लीच्या दौलत वाड्यातून सुरु होणार आहे. राणा दा आणि अंजली बाई याच नव्या वाड्यात आपला संसार करणार आहेत. अर्थात गोदा आक्कांची साथ नेहमी प्रमाणे राणा आणि अंजलीलाच आहे पण त्यातच वहिनी साहेबांची पाठराखीण म्हणून मिरवणारी चंदा मात्र सध्या वहिनी साहेब नसल्यामुळं चांगलीच चर्चेत आहे.
कोल्हापूरात चित्रीकरण सुरू असणाऱ्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेने महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलय. दिवसेंदिवस या मालिकेच्या प्रेक्षक वर्गात वाढ होताना नेहमी दिसून आलंय. गेल्या साडे तीन वर्षांपासून कोल्हापुरच्या करवीर तालुक्यातील वसगडे या छोट्याशा खेडे गावात या मालिकेचे चित्रीकरण होत आहे. या मालिकेने आता चौथ्या वर्षात पदार्पण केलंय. याच नवीन वर्षाच्या स्वागताला मालिकेच्या चित्रीकरणाचे ठिकाण सुद्धा आता बदललंय. कोल्हापुरातल्या केर्ली गावात निसर्गरम्य वातावरणात असलेल्या एका दौलत नावाच्या नवीन बंगल्यात टीम तुझ्यात रंगलाच शिफ्टिंग झाल आहे.
अर्थात राणा दा, अंजली बाई, चंदा, गोदा आक्का आणि छोटी राजलक्ष्मी यांनी आज नवीन बंगल्यात आले आणि सेल्फी देखील काढले. परंतु अंजली आणि राणादा सोबतच संपूर्ण कुटुंबाचा ज्या वाड्यात जीव गुंतला होता त्या वाड्याच्या आठवणीने टीम तुझ्यात जीव रंगला चांगलीच गुंतली आहे. या मालिकेत राणा दाची भूमिका साकारणाऱ्या हार्दिक जोशी जुन्या वाड्याच्या आठवणी सांगताना बोलतो कि, ”अंजली बाई ना पण जुना वाडा खुणावत आहे. त्या वाड्यात अनेक आठवणी असून त्या न विसरणाऱ्या आहेत.” ”साडे तीन वर्षे कोल्हापूरच्या वसगडे गावातून सुरू झालेला तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चित्रीकरणाचा प्रवास आता केर्ली गावातून पुन्हा नव्याने सुरू झाला आहे तरी जुन्या वाड्याची आठवण नेहमी येत राहिली, अशी भावना मालिकेत लोकप्रिय ठरलेली अंजली बाईची भूमिका साकारणाऱ्या अक्षया देवधरने व्यक्त केल्या.”