हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार टिव्ही अभिनेता रवी दुबे याला कोरोनाची लागण झाली आहे. झी टीव्हीवरील ‘जमाई राजा’ या मालिकेदरम्यान प्रकाश झोतात आलेल्या या अभिनेत्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टवरून याबाबत माहिती दिली आहे. रवीने आपल्या पोस्टमध्ये लोकांना विनंती केली आहे की, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. रवीच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. सर्वानी त्याच्या अब्येतीबाबत काळजी घेण्यास सांगितले आहे तर लवकर बारा हो असे म्हणत कमेंट्स केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/COsxhnBJnu5/?utm_source=ig_web_copy_link
टीव्ही अभिनेता रवी दुबेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, “हाय मित्रांनो माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शेवटच्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकास विनंती आहे की, त्यांनी स्वत: ला वेगळे करावे आणि कोविडच्या सामान्य लक्षणांची काळजी घ्या. मी माझ्या प्रियजनांसाठी स्वत: ला वेगळं केलं आहे. सुरक्षित रहा… सकारात्मकतेने राहा (आशावादी रहा) देव आपल्या सर्वांचे रक्षण करील. ” रवीची हि इन्स्टा पोस्ट प्रचंड वायरल होत आहे. या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CNsA_-sJ5SS/?utm_source=ig_web_copy_link
रवीची पत्नी अभिनेत्री सरगुन मेहताने सॅड इमोजीची प्रतिक्रिया देत पतीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. ‘बिग बॉस १४’ फेम शहजाद देओल, अहाना कुमार, पुलकित सम्राट, विकास खत्री, पराग मेहता, शिखा सिंग शहा, आशा नेगी या कलाकारांनीदेखील त्याच्या या पोस्टवर समीक्षा दिल्या आहेत. सोबतच अभिनेता रवीने लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केल्या आहेत. रवी दुबे हा टीव्ही कलाकारांपैकी एक यशस्वी व लोकप्रिय अभिनेता आहे. झी टीव्ही वरील जमाई राजा हि त्याची लोकप्रिय मालिका असून तिने प्रचंड यश मिळविले आहे. या शोमधील त्याच्या उत्तम अभिनयाचे सगळ्यांनी खूप कौतुक केले. यात तो अभिनेत्री निया शर्मासोबत दिसला होता.