हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TVS हि भारतीय ऑटोमोबाईल बाजारातील लोकप्रिय आणि आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. TVS ला मोठा ग्राहकवर्ग लाभला असून कंपनी सतत वेगवेगळ्या गाड्या बाजारात लाँच करत असते. TVS च्या आत्तापर्यतच्या सर्व गाड्यांमध्ये Apache RTR 160 खूपच लोकप्रिय आहे. अतिशय स्पोर्टी लूक असलेली हि बाईक तरुणाईला चांगलीच भुरळ पाडत आहे. आता कंपनीने या बाईकचे नवे रेसिंग एडिशन मार्केट मध्ये लाँच केलं आहे. आज आपण या बाईकचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इंजिन आणि पॉवर –
TVS Apache RTR 160 च्या नव्या रेसिंग एडिशन मध्ये 160cc एअर-कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 8750 RPM वर 16.04 PS पॉवर जनरेट करते. स्पोर्ट, अर्बन आणि रेन मोड असे ३ मोड देण्यात आले आहेत. या बाईकचे टॉप स्पीड १०७ किलोमीटर प्रतितास इतकं आहे. TVS Apache RTR 160 च्या रेसिंग एडिशनचे खास वैशिष्ट्य म्हणजे हि बाईक मॅट ब्लॅक कलरमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्यामुळे हि बाइक खूपच आकर्षक दिसते.याशिवाय बाईक मध्ये रेस-प्रेरित कार्बन फायबर ग्राफिक्स आणि चमकदार मिक्स अलॉय व्हील मिळतात. अन्य फीचर्स बाबत सांगायचं झालयास बाइकमध्ये डिजिटल एलसीडी क्लस्टर, एलईडी हेडलॅम्प , टेल लॅम्प आणि ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी (GTT) यांसारखे अपडेटेड फीचर्स मिळतात.
किंमत किती?
गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, TVS Apache RTR 160 Racing Edition ची किंमत 1 लाख 28 हजार 720 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टीव्हीएसची हि सर्वात महागडी बाईक सुद्धा तुम्ही म्हणू शकता. या गाडीचे बुकिंग TVS मोटर कंपनीच्या अधिकृत डीलरशिपवर सुरू झाली आहे.भारतीय बाजारात टीव्हीएसची हि नवी स्पोर्ट बाईक होंडा, हिरो आणि बजाजच्या गाडयांना तगडी टक्कर देऊ शकते.