TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

TVS Ronin 225
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या भारतीयांच्या मनात बुलेट म्हणजेच रॉयल एनफिल्ड मोटरसायकल एक वेगळी छाप आहे. यामुळेच बाईक बनवणार्‍या कंपन्या आता मजबूत बाइक्सवर (TVS Ronin 225) भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील प्रसिद्ध कंपनी TVS मोटरने आपली मोस्ट अवेटेड बाईक TVS Ronin 225 भारतात लॉन्च केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 1.49 लाख (एक्स-शोरूम) आहे. तर बाइकच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 1,68,750 रुपये (एक्स-शोरूम) आहे. TVS ची ही नवी गाडी बुलेटला जोरदार टक्कर देईल .

वैशिष्ट्ये- (TVS Ronin 225)

ही बाईक आकर्षक डिझाइन आणि अनेक आधुनिक फीचर्ससह कंपनीने लॉन्च केली आहे. या बाईकच्या वैशिष्ट्या बाबत बोलायचं झालं तर TVS मोटर्सच्या मते, रोनिन बाईकमध्ये ड्युअल पर्पज टायर आहे. दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनल एबीएस मिळतात. तसेच high ग्राउंड क्लीयरन्स आणि गोल्डन-डिप्ड USD फ्रंट फोर्क्ससह मजबूत बॉडी आहे.

TVS Ronin 225

बाईकमध्ये (TVS Ronin 225) एलईडी लाईट्स आणि वर्तुळाकार हेडलॅम्प देण्यात आले आहेत. यात स्वतंत्र स्टँडसह डिजिटल गोल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. हे कंपनीच्या पेटंट TVS SmartXonnect ब्लूटूथ वैशिष्ट्यासह येते. याच्या मदतीने तुम्ही व्हॉइस असिस्टने बाईक नियंत्रित करू शकता.

TVS Ronin 225

कसे आहे इंजिन-

आता गाडीच्या (TVS Ronin 225) इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, TVS Ronin ला 225.9cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते, जे 7,750 rpm वर 15.01 kW पीक पॉवर आणि 3,750 rpm वर 19.93 Nm जास्तीत जास्त टॉर्क निर्माण करते. TVS Ronin चे टॉप स्पीड 120 किमी प्रतितास आहे.

TVS Ronin 225

TVSच्या या गाडीच्या सस्पेन्शन बाबत बोलायचं झालं तर बाईकला पुढील बाजूस अप-डाउन फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन मिळेल. तसेच गाडीच्या पुढील आणि मागील डिस्क ब्रेक उपलब्ध असतील.

Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत

Toyota Urban Cruiser Hyryder 2022 : Toyota ची Urbun Cruiser Hyryder लॉन्च; सेल्फ चार्जिंगचे दमदार फीचर्स

Honda N7X : होंडाची ही नवीन SUV देणार Mahindra XUV700 ला तगडी फाईट; जाणून घ्या किंमत अन लॉंचची तारीख

Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार