कमी किंमतीत जास्त मायलेज; ‘ही’ Bike तुमच्यासाठी ठरेल बेस्ट डील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण नवीन गाडी घेण्याचा विचार करत असतो तेव्हा कमीत कमी खर्चात जास्त मायलेज देणारी गाडी खरेदी करण्याकडे आपला कल असतो. सध्याच्या वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचा खर्च पाहता ही अपेक्षा नक्कीच योग्य आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कमी पैशात परवडणारी गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका बाईक बद्दल सांगणार आहोत जी खरेदी करायलाही जास्त पैसे लागत नाही आणि तिच्या दमदार मायलेज मुळे प्रवास करताना तुमच्या खिशातून जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. होय, या बाईकचे नाव आहे TVS sport … चला तर या गाडीची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊयात…

इंजिन –

TVS sport ही बाईक 2007 ला बाजारात आली आणि तेव्हापासून ते ग्राहकांना सेवा देत आहे. कंपनीने या TVS स्पोर्ट बाइकमध्ये 109.7 cc BS6 इंजिन दिले आहे. हे इंजिन 7,350 rpm वर 8.18 bhp पॉवर आणि 4,500 rpm वर 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. या मोटरसायकलमध्ये तुम्हाला 4 मॅन्युअल गिअर्स देण्यात आले आहे. हे इंजिन गार करण्यासाठी एअर कूल्ड सिस्टीम देण्यात आली आहे. गाडीच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, TVS स्पोर्ट बाईक मध्ये तुम्हाला फ्युएल गेज, एनालॉग ओडोमीटर, एनालॉग स्पीडोमीटर, ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन, शिफ्ट लाईट, साइड लाईट, एलईडी लाईट्स हे फिचर्स उपलब्ध आहे.

मायलेज किती ?

कोणतीही गाडी खरेदी करताना ती मायलेज किती देता हे आपण बघत असतो. त्यामुळे TVS स्पोर्टच्या मायलेज बद्दल बोलायचे झाले तर तो या बाबतीत खूप चांगला आहे. ही टीव्हीएस स्पोर्ट्स 1 लिटर पेट्रोलमध्ये 70 किलोमीटरचे अंतर कापू शकते. त्यामुळे या बाईककडे परवडणारी बाईक म्हणून आपण बघू शकतो.

किंमत किती?

TVS स्पोर्ट बाईक खरेदी करण्यासाठी जास्त पैशाची गरज नाही. तुम्ही ज्या किमतीत स्कुटर खरेदी करता त्याच किमतीत तुम्ही TVS स्पोर्ट खरेदी करू शकता. TVS स्पोर्ट या बाईकची किंमत तिच्या रंगावर अवलंबून आहे . सध्या ही बाईक तुम्ही 7 रंगांमध्ये खरेदी करू शकता. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 65 हजार 675 रुपयांपासून सुरू होते.