या महिन्याच्या अखेरीस लागणार बारावीचा निकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : दहावी नंतर आता बारावीचा निकालचे विद्यार्थी व पालकांना वेध लागले आहेत. दहावी अकरावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार केला जात असून त्याचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जुलै महिनाअखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार 16 जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयाने निकालाचे काम सुरू केले आहे. अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी मंडळाने 23 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. यंदा औरंगाबाद भागातील जालना, परभणी, बीड, औरंगाबाद आणि हिंगोली अशा पाच जिल्ह्यातून एकूण 1 लाख 43 हजार 925 परीक्षार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. सहा दिवसात 1 लाख 8 हजार 895 विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयाकडून भरण्यात आली आहे. 23 हजार 750 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले असेल तरी ते अंतिम करने बाकी आहे. तर 11 हजार 280 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन बोर्डाला प्राप्त झाले नाही.

एसएससी बोर्डाच्या प्रभारी अध्यक्षा सुनिता पून्ने यांनी सांगितले की, नियमित विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाचे काम सुरळीत सुरू असले तरी पुन्हा परीक्षा देणारे परिक्षार्थी, गॅप घेतलेले विद्यार्थी, रिपीटर्स तसेच 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना कनिष्ठ महाविद्यालयांना अडचणी येत आहेत. निकाल बरोबर लावण्यासाठी शिक्षण मंडळाकडून दररोज महाविद्यालयांकडे पाठपुरावा सुरू आहे. 31 जुलैच्या आत बारावीचा निकाल लावण्याचे मंडळाचे प्रयत्न आहेत.

Leave a Comment