कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील वाठार येथे गेल्या 20 वर्षापासून रहिवाशी तरीही ना पुरावा, ना ओळख अशा परिस्थितीत राहणाऱ्या लोकांना अखेर कराडचे तहसिलदार अमरदीप वाकडे यांच्यामुळे 50 कुटुंबियांना रेशनिंग कार्ड मिळाल्याने रहीवाशी पुरावा अन् गावचे नांवही मिळाले. परराज्यातून तसेच राज्यातील इतर भागातून राहणाऱ्या या लोकांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच आनंद पहायला मिळाला, यावेळी त्यांनी प्रशासनाचे धन्यवादही मानले.
https://www.facebook.com/1506067669510655/posts/3974518102665587/
कराड शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाठार गावात गेली 20 वर्ष अनेक कुटुंबे राहत आहेत. अनेक वृध्द महिलांही आहेत, परंतु आजअखेर येथील लोकांना रहिवाशी असल्याचा पुरावा किंवा ओळख नव्हती. परंतु तहसिलदार अमरदीप वाकडे यांच्या पुढाकाराने तब्बल 50 कुटुंबियांना रेशनिंग कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाचे निरीक्षक श्री. वसू, अव्वल कारकून श्री. गबाले, सर्कल श्री. ढाणे, रास्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
तहसिलदार अमरदीप वाकडे म्हणाले, वाठार या गावाजवळ परराज्यातून आलेली 15 ते 20 वर्षे झाली काही कुटुंब राहत आहेत. रेशनिंग कार्ड नसल्याने आणि अन्नधान्यांची सोयही नाही. लाॅकडाऊनच्या काळात काही कामही नसल्याने फार हालखीचे जीवन जगावे लागत असल्याची माहिती मिळाली. आम्ही येथे भेट दिली, यांची परिस्थिती पाहिली. अतिशय वाईट होती. तालुक्यात अशाप्रकारे अजून काही कुटुंबे असतील तर त्यांची माहिती आम्हांला द्यावी.
तहसिलदार आणि प्रशासनाचे आभार
गेले अनेक वर्ष आम्ही वाठार येथे राहत आहोत. पाणी, रेशनिंग कार्ड एवढ्या वर्षांनी मिळाल्याने आनंद वाटत होत आहे. कोरोनाच्या काळात धान्य मिळाले, आम्ही तहसीलदार साहेब आणि प्रशासनाचे आभारी मानत असल्याचे उदगार चित्रकला खंडू जाधव यांनी काढले.