Tuesday, June 6, 2023

ट्विटरचा ट्रम्पना मोठा झटका!! 2024 ची निवडणूक लढवली तरीही त्यांचे ट्विटर अकाउंट बंदच ठेवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या वक्तव्याने सुप्रसिद्ध आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी बरेच आक्षेपहार्य वक्तव्य ट्विटर मार्फत केले होते. यामुळे ट्विटरने त्यांचे अकाउंट बंद केले होते. यावरती ट्विटरने अजून एक घोषणा केली असून ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी बंद केले असून ते 2024 मध्ये राष्ट्रपती निवडणूक जरी लढले तरी अकाउंट सुरू केले जाणार नाही. ट्विटरचे सीएफओ नेड सेगल यांनी याबाबत घोषणा केली.

अमेरिकेच्या कॅपिटल हिल घटनेनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती ट्रम्प यांच्यावर ट्विटर, फेसबूक आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटने कायमस्वरूपी प्रतिबंध लावले होते. यादरम्यान ट्रम्प यांनी आत्ताच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती परत दिसून आले होते. त्यांनी नवीन अकाऊंटवरून एक पोस्टसुद्धा केली होती.

अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये हार झाल्यानंतरपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. गेल्या मंगळवारी माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सिनेटमध्ये दुसर्यांदा महाभियोग सुरू करण्यात आला. अमेरिकेच्या इतिहासामध्ये ही पहिली वेळ आहे ज्यामध्ये माजी राष्ट्रपतीच्या विरोधात प्रस्ताव आणला गेला आहे. अमेरिकेच्या सिनेटने हा महाभियोगाला संविधानिक ठरवले आहे. यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाचा रस्ता साफ झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’