धक्कादायक! बिल गेट्स, बराक ओबामा यांच्यासह अनेक दिग्गज्यांचे ट्विटर अकाउंट हॅक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लाखो   फोलोवर्स असणाऱ्या  उद्योगपतींना, सेलेब्रिटिना  हॅकर्स कडून लक्ष्य करण्यात आले आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंट  वरून अनेक चुकीचे संदेश दिले जात आहेत. त्यामुळे सोशल मिडियात खळबळ माजली आहे. दिग्गज लोकांच्या अकाउंट मध्ये मायक्रोसॉफ्ट चे सहसंस्थापक बिल गेट्स, टेस्ला चे सीईओ इलॉन मस्क, अमेरिकी रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जो बिडेन, बाराक ओबामा, इस्राईल चे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, बफेट, अँपल, उबर सह अनेकांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहेत.

 अनेकांच्या अकाउंट वरून  चुकीच्या पद्धतीने मॅसेज करून पैसे मागितले गेले आहेत. याचा शोध सुरू आहे. बिल गेट्स यांच्या अकाउंट वर पोस्ट करण्यात आले आहे की , प्रत्येकजण मला पैसे परत करण्यास सांगत आहे. परंतु आता वेळ आली आहे की तुम्ही मला एक हजार डॉलर्स पाठवा मी तुम्हांला  दोन हजार डॉलर्स पाठवेन. अश्या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.

 टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांच्या अकाउंट  वरून पोस्ट केले आहे की, पुढील एक तासात बिटकॉईन मध्ये पाठवलेली रक्कम दुप्पट होऊन तुम्हाला परत केली जाईल.  मी कोविड साथीच्या आजारामुळे दान करत आहे. बिटकॉईन पत्त्याच्या लिंकसह ट्विटमध्ये उल्लेख आहे.  काही  वेळेमध्येच शेकडो लोकांनी दहा लाख पेक्षा अधिक डॉलर्स पाठवले. त्यामुळे या संपूर्ण  प्रकारचा तपास ट्विटवर कडून सुरू आहे. याबाबत लवकरच माहिती दिली जाईल असे ट्विटर ने म्हंटले आहे.

केंद्र सरकारने लॉन्च केली जगातील सर्वात स्वस्त Corona Testing Kit, आता किती रुपये लागतील जाणून घ्या

कोरोनावरची लस अमेरिकेला सापडली? ट्रम्प यांच्या ‘या’ ट्विटने एकचं खळबळ 

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

SBI, ICICI आणि HDFC बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली आहे एक खास FD योजना, जाणून घ्या

कोरोना संकटात TCS कंपनीत ४० हजार जागांसाठी भरती; बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी

Leave a Comment