ट्विटरने बंद केला Account verification program, आता Blue टिकसाठी वाट पाहावी लागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने आपला Account verification program बंद केला आहे. कंपनीने म्हटले आहे की,” त्यांना अद्याप त्यांच्या एप्लिकेशन आणि रिव्यू प्रोसेस मध्ये सुधारणा करायची आहे.” ट्विटरने गेल्याच महिन्यात कबूल केले की,”त्यांनी चुकून व्हेरिफाईड अकाउंट म्हणून घोषित केलेले काही अकाउंट्स कायमचे निलंबित केले होते.” कंपनीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,”आम्ही व्हेरीफिकेशनसाठी एप्लिकेशन तात्पुरते स्थगित केले आहे जेणेकरून आम्ही आमच्या एप्लिकेशन आणि रिव्यू प्रोसेसमध्ये सुधारणा करू शकू.”

ट्विटरने म्हटले आहे,”आम्हाला माहित आहे की, जे व्हेरीफिकेशनची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हे निराशाजनक आहे. आम्हाला अद्याप काही गोष्टी दुरुस्त करायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही तुमच्या संयमाचे कौतुक करतो.”

गेल्याच महिन्यात, ट्विटरने म्हटले होते की,” त्यांनी चुकून बनावट अकाउंट्सचे व्हेरीफिकेशन एप्लिकेशन मंजूर केले आहेत.” एका निवेदनात म्हटले आहे की,”आम्ही आता आमच्या प्लॅटफॉर्म मॅनिपुलेशन आणि स्पॅम पॉलिसी नुसार असे पेडिंग अकाउंट्स कायमचे सस्पेंड केले आहेत आणि त्यांचे व्हेरिफाईड बॅज काढून टाकले गेले आहेत.”

2017 मध्ये देखील verification program बंद करण्यात आला
ट्विटरने यापूर्वी 2017 मध्ये त्यांचा verification program बंद केला होता, जो आता मे 2021 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला.

मे मध्ये, ट्विटरने आपली नवीन व्हेरीफिकेशन एप्लिकेशन प्रोसेस पुन्हा सुरू केली, ज्यामध्ये जागतिक स्तरावरील युझर्सना सहा श्रेणींमध्ये व्हेरीफिकेशन आणि रिव्यू साठी ब्लू बॅज देण्यात आला. मात्र, एका आठवड्यातच ट्विटरने आपला ब्लू बॅज व्हेरिफिकेशन प्रोग्राम बंद केला आणि सांगितले की,” ते आता मिळालेल्या एप्लिकेशनचे व्हेरीफिकेशन करतील.

Leave a Comment