भारत चीन झटापटीवरुन पोलिस अधिकारी आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटर वाॅर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारत आणि चीनच्या सीमेवर वातावरण बिघडले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत. सिने दिगदर्शक तथा अभिनेता अनुराग कश्यप यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक ट्विट केले आहे. ज्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्यांना राग आल्याचे दिसून येत आहे. या दोघांचे ट्विटर वर जणू युद्ध सूरु आहे. अनुराग कश्यप यांनी त्यांच्या अकॉउंटवरून “शेवटपर्यंत सर्व देशद्रोही होतील आणि एकच देशभक्त वाचेल, जो त्या गुफेत बसला असेल हिटलर सारखा.” असे ट्विट केले आहे. त्यावरून प्रणव महाजन यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

 

त्यांच्या ट्विटनंतर प्रणव महाजन या पोलीस अधिकाऱ्याने ट्विटला उत्तर देत “हे ट्विट आपले संस्कार दाखविते. लाजिरवाणे.” असे ट्विट केले आहे. त्यावर पुन्हा कश्यप यांनी, “चुकीचे बोलले का वाईट वाटले? का घाबरून गेला? किती बिचारे झाले आहात महाजन साहेब.” असे उत्तर दिले आहे. या दोघांचे हे ट्विटर वॉर गाजत आहे. त्यांच्या ट्विटला पुन्हा प्रणव यांनी उत्तर दिले आहे. यात काहीच नाही आहे, मी केवळ प्रार्थना करतो आहे की हे ट्विट कोणत्याच शहिदांच्या घरच्यांनी अथवा त्यांच्या आत्म्यानी वाचू नये, त्यांना अत्यंत दुःख होईल. असे प्रणव महाजन यांनी लिहिले आहे.

 

 

या ट्विटवरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी अनुराग कश्यप यांची बाजू घेतली आहे तर काहीजण प्रणव महाजन यांच्या बाजूनेही बोलत आहेत. तर ट्विटरवर मोदी समर्थक ही प्रणव महाजन यांना पाठींबा देताना दिसून येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment