Tuesday, June 6, 2023

ट्रम्प यांचे अकाउंट सस्पेंड केल्यामुळे Twitter ची मार्केट कॅप 5 अब्ज डॉलर्सने घसरली

नवी दिल्ली । डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट निलंबित झाल्यानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरून निघून जाण्याचा या कंपन्यांवर खोल परिणाम झाला आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे वैयक्तिक खाते कायमचे ब्लॉक केले आहे. या निर्णयानंतर, सोमवारी वॉल स्ट्रीटमध्ये twitter चे शेअर्स जवळपास 12 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले, त्यानंतर कंपनीच्या मार्केटकॅप मध्ये 5 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला आहे.

फेसबुकच्या शेअर्समध्येही झाली घट
फेसबुकच्या शेअर्समध्येही सुमारे 4 टक्क्यांनी घट झाली आहे. याशिवाय गुगलची मालकी असलेली कंपनी Alphabet Inc च्या शेअर्समध्येही सुमारे 2.31 टक्क्यांनी तोटा झाला. ट्रम्प यांचे खाते निलंबित केल्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

या कंपन्यांचेही शेअर्स घसरले-

> अ‍ॅमेझॉनचे शेअर्स नॅस्डॅकवर सुमारे 2.15 टक्क्यांनी घसरले.
> Apple चे शेअर्स देखील सुमारे 2.31 टक्क्यांनी घसरले.
> PayPal च्या शेअर्समध्येही 2.05 टक्क्यांनी घट झाली.
> Adobe Inc चे शेअर्सही 2.24 टक्क्यांनी घसरले.

अकाउंट का निलंबित केले?
ट्रम्प समर्थकांचे म्हणणे आहे की, या सोशल मीडिया नेटवर्क्सने ट्रम्प यांच्यावर अन्याय केला आहे आणि फ्री स्पीचच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामबद्दल त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे. अशा परिस्थितीत या कंपन्या त्यांचे युझर्स गमावू देखील शकतात. कॅपिटल हिल येथील हिंसाचारानंतर भविष्यातील हिंसाचाराच्या शंकेमुळे ट्रम्प यांचे खाते निलंबित केले गेले आहे.

2009 मध्ये अकाउंट तयार केले गेले होते
2009 मध्ये ट्रम्प यांचे ट्विटरवर अकाउंट तयार झाले होते. ट्रम्प यांचे अकाउंट निलंबित करण्यापर्यंत त्यांचे 8.9 कोटी फॉलोअर्स होते. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प 51 जणांना फॉलो करत होते. गेल्या 12 वर्षात त्यांनी 57 हजार ट्वीट केले आहेत. फक्त 30,572 टेक्स्ट वाले ट्वीट. याशिवाय 3,624 ट्वीटला उत्तर देण्यात आले. 12,906 लिंक किंवा फोटो ट्विट केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.