व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महिलेला एकटं पाहून नराधमांनी साधला धाव, मध्यरात्री घरात शिरून दिल्या ‘या’ नरकयातना

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांनी मध्यरात्री घरात घुसून एका महिलेवर सामूहिक अत्याचार केला आहे. पीडित महिला घरी एकटी असल्याचे पाहून नराधमांनी हा डाव साधला आहे. त्यांनी पीडितेला चाकुचा धाक दाखवून तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे. या घटनेनंतर पीडित महिला रात्रभर घाबरलेल्या अवस्थेत घरात बसून राहिली. यानंतर तिने दुसऱ्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आपल्या शेजाऱ्यांना सांगितला तेव्हा हि धक्कादायक घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पीडित महिलेने केलेल्या वर्णनावरून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. घटनेच्या दिवशी पीडित महिला सोमवारी रात्री आपल्या घरी एकटीच होती. रात्री अडीचच्या सुमारास दोन जणांनी पीडितेच्या घराचा दरवाजा ठोठावला. यावेळी आरोपींनी पाणी मागण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या घरात प्रवेश केला. यानंतर या आरोपी नराधमांनी चाकुचा धाक दाखवत पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. यावेळी आरोपींनी आळीपाळीने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिला घाबरलेल्या अवस्थेत घरात तशीच बसून राहिली. यानंतर या पीडित महिलेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती तातडीने वाडी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी आणि विनिता साहू हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता आरोपींनी या अगोदरसुद्धा पीडितेवर अशा प्रकारे बलात्कार केला होता. समाजात बदनामी होईल, या कारणाने पीडितेने त्यावेळी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. पीडितेने केलेल्या वर्णनानुसार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.