हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या फेक व्हिडिओ (Fake Video) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, अहमदाबादच्या सायबर क्राईम पथकाने दोन जणांना अटक केली आहे. या दोघांचाही आपशी आणि काँग्रेसशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे सतीश वनसोला आणि आर बी बारिया अशी आहेत. यातील पहिला आरोपी सतीश वनसोल हे काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी (Jiganesh Mewani) यांचे PA आहेत. तर आर बी बारीया हा आपचा जिल्हा प्रमुख आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अमित शहांचा सभेतील एक व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हिडिओत अमित शहांनी दोन वेगवेगळ्या सभेत केलेले वक्तव्य जोडण्यात आली होती. हे वक्तव्य त्यांनी आरक्षणासंदर्भात केली होती. या वक्तव्यांचाच फेक व्हिडिओ सतीश वनसोला आणि आर बी बारिया यांनी बनविला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या पोलीस या प्रकरणाचा आणखीन खोलवर तपास करीत आहेत. तसेच यामागे नेमका कोणाकोणाचा हात आहे हे शोधण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, अमित शहांच्या वक्तव्याचा फेक व्हिडिओ अनेक राज्यांमध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, नागालँड अशा भागांमध्ये पोलिसांचे पथके पाठवण्यात आली आहेत. याचं फेक व्हिडिओ प्रकरणी आता तेलंगनाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची ही चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी एका काँग्रेस नेत्याला , एका समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच या सर्व प्रकरणात आणखीन बऱ्याच लोकांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.