पाटण | दोन दिवसापूर्वी उरुल घाटात ट्रक चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून जबरी चोरी केलेल्या संशयितांना मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल, तलवार, चाकू, जप्त करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ऋषिकेश दादासो माने (वय- 20, रा. चरेगाव) व ऋषिकेश अशोक शितोळे (वय- 21, रा. शितळवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. सदर आरोपींना न्यायदंडाधिकारी पाटण यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे. तसेच दीड महिन्यापूर्वी उरुल घाटात अशाच प्रकारे झालेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच अशा प्रकारची इतर ठिकाणी काही गुन्हे केले आहेत का याबाबत तपास सुरू असून दोन दिवसांमध्ये मल्हारपेठ पोलिसांनी तपास चक्र फिरवून जबरी चोरी केलेल्या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
गुन्ह्याचे तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, सहाय्यक फौजदार वेताळ, अंकुशी, पोलीस हवालदार घाडगे, पोलीस नाईक अमोल पवार, संदीप घोरपडे, पृथ्वीराज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल वैभव पवार, शेडगे, संभाजी जाधव, चालक थोरवे, साळवी यांनी काम पाहिले.